राष्ट्रीय बंजारा क्रांतीदलाच्यावतीने ‘ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’

राष्ट्रीय बंजारा क्रांतीदलाच्यावतीने ‘ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’

पुणे, ता. ७ ः राष्ट्रीय बंजारा क्रांतीदलाच्या वतीने मुंबई येथे आझाद मैदानावर भटके-विमुक्त तथा ओबीसींचा ‘ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’ आयोजित केला होता. या वेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड, मूर्ती राठोड, लालमणी राज्यभर, डॉ. अरविंद कहार, हरिदास गंगाखेडकर आदी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवणे, क्रिमिलेयर संज्ञेमधून भटक्या-विमुक्त तथा बारा बलुतेदार यांना वगळण्यात यावे, क्रिमिलेयरची मर्यादा वाढवून १५ लाख करण्यात यावी, मागासवर्गीयांचे बढतीतील आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे, आदी मागण्यांसाठी राज्य सरकारला निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com