पुणे महापालिका घेणार ४ लाख अँटिजन टेस्ट कीट

पुणे महापालिका घेणार ४ लाख अँटिजन टेस्ट कीट

पुणे, ता. ७ ः पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोनाच्या चाचणीचे प्रमाण वाढविण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यासाठी अँटिजन टेस्ट करण्यासाठी ५० लाख रुपयांच्या ४ लाख टेस्ट कीट खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
एका आठवड्यापासून शहरात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शंभरपेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र, आता रोज लागण होणाऱ्या नागरिकांची संख्या अडीच हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
महापालिकेने कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवले आहे. त्यामध्ये आरटीपीसीआर सह अँटिजन चाचणी केली जात आहे. शहरातील भाजी विक्रेते, पथारी व्यावसायिक यासह इतर विक्रेते अशा गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांची महापालिकेकडून अँटिजन चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथक स्थापन केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे. त्यानुसार आता महापालिकेने अँटिजन टेस्टसाठी कीट खरेदीसाठी निविदा काढली होती. त्यामध्ये चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला. सर्वांत कमी दर केप्स फार्मा या कंपनीने दिला असून, १२ रुपये२४ पैसे या दराने एक कीट पुरवली जाणार आहे. यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात आली असून, त्यातून सुमारे ४ लाख ८ हजार कीट घेतल्या जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com