चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी
कालिचरण महाराजाला जामिन

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराजाला जामिन

पुणे, ता. ७ : प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराज याला न्यायालयाने शुक्रवारी (ता. ७) २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यावर कालिचरण याने गुरुवारी (ता.६) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदीन यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सरकार पक्षातर्फे पोलिस व सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी लेखी म्हणणे सादर केले होते. त्यावर शुक्रवारी पुन्हा सरकार व बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद झाला. कालिचरण याच्यावतीने अॅड. अमोल डांगे यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे १९ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानावर आयोजित ‘शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव’ कार्यक्रमात दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण याच्यासह पाच जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com