घर खरेदीत सामंजस्य मंच उपयोगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घर खरेदीत सामंजस्य मंच उपयोगी
खाटांची संख्या डॅशबोर्डवर अपडेट करा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांचे खासगी रुग्णालयांना आदेश

घर खरेदीत सामंजस्य मंच उपयोगी

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः रेरा कायदा आणि महारेराअंतर्गत स्थापन केलेला सामंजस्य मंच अर्थात ‘कन्सिलिएशन फोरम’ हे गृहखरेदीदार आणि बांधकाम विकसक यांच्यातील वाद मिटवण्याबरोबरच न्यायालयीन बाबींसाठी लागणारा वेळ व पैसा वाचवण्यासाठी देखील फायदेशीर ठरत आहेत. याद्वारे आतापर्यंत पुण्यातील तब्बल ३५१ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे यांनी दिली.

नियामक संस्थेचा एक भाग म्हणून, विवादित पक्ष एकमेकांशी योग्य पद्धतीने जोडले जावेत आणि त्यांनी सामंजस्याने आपल्या समस्यांचे निराकरण करावे, याबरोबर त्यांना असलेल्या शंका व गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशाने तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली मार्च २०१८ मध्ये या सामंजस्य मंचाची स्थापना झाली. या मंचामधील तज्ज्ञ व्यक्तींमध्ये बांधकाम व्यवसायातील सर्वांचेच प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रेडाई पुणे मेट्रो, मुंबई ग्राहक पंचायत आणि इतर बांधकाम विषयाशी संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. २०१८ मध्ये स्थापन झालेल्या या मंचाच्या माध्यमातून आजवर बांधकामाशी संबंधित अनेक वादविवाद व संबंधित अनेक बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला. याबरोबरच महारेराअंतर्गत स्थापन केलेल्या सामंजस्य यंत्रणेचा पर्याय निवडलेले पीडित वाटपदार किंवा प्रवर्तकांची प्रकरणेसुद्धा यशस्वीरीत्या सोडवण्यात आली.

या मंचाअंतर्गत क्रेडाई-पुणे मेट्रो फोरमच्या वरिष्ठ समन्वयकांमध्ये क्रेडाई पुणे मेट्रोचे माजी अध्यक्ष हेमंत नाईकनवरे, सध्याचे उपाध्यक्ष अमर मांजरेकर, आदित्य जावडेकर, सचिव अरविंद जैन, खजिनदार आय.पी. इनामदार, माजी उपाध्यक्ष किशोर पाटे आणि हेमेंद्र शहा यांबरोबर इतर माजी व्यवस्थापकीय समिती सदस्य यांचा समावेश आहे.

...अशी होते प्रक्रिया
- कोणताही ग्राहक किंवा विकसकाने महारेराच्या संकेतस्थळावर तक्रार करायची
- तक्रारीमध्ये सामील असलेल्या अन्य पक्षाला आपोआप सामंजस्याची विनंती जाते
- दुसऱ्या पक्षाने विनंती स्वीकारली की पुढील सात दिवसांत तक्रारदाराला महारेराला आवश्यक शुल्क भरावे लागते
- त्यानंतर कारण खंडपीठाकडे पाठवले जाते
- उभयतांमध्ये सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो

‘‘सामंजस्य मंचात खंडपीठ व त्याचे सदस्य हे तटस्थ तृतीय पक्ष म्हणून या संपूर्ण प्रक्रियेत काम करतात. त्यामुळे कमी वेळेत योग्य निवाडा होऊ शकतो.’’
- अनिल फरांदे, अध्यक्ष क्रेडाई, पुणे मेट्रो

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top