मोबाईल चोरणाऱ्या टोळीस बेड्या
पुणे, ता. १० ः पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले.
मुकेश शिवलाल दिवाकर (वय २१, रा. खराडी, मुळ रा. उत्तरप्रदेश), दीपककुमार मोहन जयस्वाल (वय २३, रा. चंदननगर, मूळ रा. उत्तप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक पोलिस अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी करीत होते. त्यावेळी पथकातील एका कर्मचाऱ्यास टोळीतील दोघेजण खराडी येथील चंदननगर बाजारपेठेत मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावून दिवाकर व जयस्वाल या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ७६ हजार रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे २, रेडमी २, ओपोचे २ व एमआय कंपनीचे दोन असे एकूण आठ मोबाईल जप्त केले. संशयित आरोपींनी हे मोबाईल शहराच्या मध्यवर्ती भागासह खराडी, चंदननगर, वडगाव शेरी या भागातून चोरले असल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपींचा एक साथीदार पोलिसांच्या हातातून निसटला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात तीन, विश्रामबाग पोलिस ठाण्यात एक असे मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.