जिल्ह्यात पावणे दोन लाख मुलांचे लसीकरण
गेल्या सात दिवसांची एकूण संख्या; दररोज सरासरी वीस हजार जणांना डोस

जिल्ह्यात पावणे दोन लाख मुलांचे लसीकरण गेल्या सात दिवसांची एकूण संख्या; दररोज सरासरी वीस हजार जणांना डोस

पुणे, ता. १० : पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत १५ ते १८ या वयोगटातील १ लाख ८० हजार ८९० विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस देण्यात आला. या एकूण लसीकरणात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक १ लाख १९ हजार ४५७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहर व जिल्ह्यात दररोज सुमारे सरासरी २० हजार विद्यार्थ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. लसीकरणाची हीच गती कायम राहिल्यास, जानेवारी अखेरपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांना पहिला डोस पूर्ण होऊ शकणार आहे.

राज्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांना ही लस देण्यात आली. प्रौढांच्या लसीकरणानंतर सुमारे एक वर्षांनी उशिरा म्हणजेच गेल्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण सुरु झाले आहे.

पुणे शहरात रोज सरासरी सुमारे साडेपाच हजार, पिंपरी चिंचवडमध्ये सरासरी सुमारे साडेचार हजार तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरासरी रोज दहा हजार विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. यानुसार पुणे शहरात आतापर्यंत ३६ हजार ९१९, पिंपरी चिंचवडमध्ये २४ हजार ५१४ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १ लाख १९ हजार ४५७ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १५ ते १८ या वयोगटात इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि काही प्रमाणात बारावीचे विद्यार्थी येतात. त्यामुळे ग्रामीण भागात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

लसीकरणास पात्र विद्यार्थी
-पुणे शहर : २ लाख २४ हजार ५१५
-पिंपरी चिंचवड : १ लाख १६ हजार ७००
-ग्रामीण भाग : २ लाख ११ हजार ९७५
-जिल्हा एकूण : ५ लाख ५३ हजार १९०

लसीकरण झालेले विद्यार्थी
-पुणे शहर : ३६ हजार ९१९
-पिंपरी चिंचवड : २४ हजार ५१४
-ग्रामीण भाग : १ लाख १९ हजार ४५७
-जिल्हा एकूण : १ लाख ८० हजार ८९०

शिल्लक लसीकरण
-पुणे शहर : १ लाख ८७ हजार ५९६
-पिंपरी चिंचवड : ९२ हजार १८६
-ग्रामीण भाग :९२ हजार ८१८
-जिल्हा एकूण : ३ लाख ७२ हजार ३००

विद्यार्थ्यांच्या लसीकरणात पुणे जिल्ह्याने
प्रथमपासूनच राज्यात आघाडी घेतली आहे. योग्य नियोजन, पालक, शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. लसीकरणाची ही गती कायम राहिल्यास जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण होईल.
-डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com