सेवानिवृत्तांच्या ठेवीचे पैसे परत करण्याचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्तांच्या ठेवीचे पैसे परत करण्याचा आदेश
सेवानिवृत्तांच्या ठेवीचे पैसे परत करण्याचा आदेश

सेवानिवृत्तांच्या ठेवीचे पैसे परत करण्याचा आदेश

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : सेवानिवृत्तांसाठी सुरू केलेल्या तीन वर्षांच्या मुदतठेव योजनेमध्ये गुंतवलेले पैसे ठेवीदाराला व्याजासह परत करण्याचे आदेश ग्राहक आयोगाने डीएसके अ‍ॅण्ड असोसिएटला दिला.
ठेवीदाराने गुंतवलेले १५ लाख रुपये १८ जानेवारी २०१७ पासून १२.५० टक्के व्याजाने परत द्यावे, असे आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे. नुकसानभरपाई आणि तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी चंद्रकांत शंकरराव गायकवाड यांनी अ‍ॅड. राहुल थाटे यांच्यामार्फत डीएसके अ‍ॅण्ड असोसिएट्स विरुद्ध तक्रार दाखल केली होती. असोसिएट्स सेवानिवृत्त झालेल्या लोकांसाठी तीन वर्षांची एफडी पेन्शन योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये तक्रारदारांनी १५ लाख रुपये मुदतठेवीमध्ये गुंतवले. या मुदत ठेवीबद्दल असोसिएट्सने तक्रारदारांना १५ लाख रुपयांचा धनादेश १८ मे २०१६ रोजी दिला. मात्र तो वटला नाही. म्हणून तक्रारदारांनी ४ जून २०१९ रोजी वकिलामार्फत असोसिएट्सला नोटीस पाठवली होती. गुंतवलेले १५ लाख रुपये व त्यावरील ५ लाख रुपये व्याज असे एकूण २० लाख रुपये मिळावे, अशी मागणी तक्रारदारांनी केली होती. याबाबत डी. एस. कुलकर्णी यांनी येरवडा कारागृहातून आयोगास पत्र पाठवून त्यांचे कार्यालय फेब्रुवारी २०१७ पासून पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बंद आहे. त्यांचा या प्रकरणातील असोसिएट्सशी काही संबंध नाही. कारागृहात असल्याने या प्रकरणात लेखी जबाब दाखल करू शकत नाही. त्यामुळे हे प्रकरण स्थगित ठेवावे, अशी विनंती केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top