स्वारगेट स्थानकावर रोखली लालपरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वारगेट स्थानकावर रोखली लालपरी
स्वारगेट स्थानकावर रोखली लालपरी

स्वारगेट स्थानकावर रोखली लालपरी

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : स्वारगेट स्थानकावरील एसटी महामंडळाच्या गाड्या (लालपरी) यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सोडण्यात येत होत्या. असा आरोप करत संपकरी कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध करून लालपरी रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्थानकावर काही वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर), पुणे स्टेशन आदी आगारांसह जिल्ह्यातील १३ डेपोतील कर्मचारी दोन महिन्यांपासून संपात सहभागी झाले आहेत. हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार तसेच एसटी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यात सरकारला काही अंशी यश येत आहे. त्यांच्या मदतीने एसटीने काही मार्ग सुरु केले आहेत. प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी सरकार यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना मार्गावर पाठवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे विरोध केला, असे एसटी कामगारांनी सांगितले.
पुणे विभागातील १३ पैकी आठ आगार एसटी प्रशासनाला सुरु करता आले आहेत. परंतु, स्वारगेट स्थानकातील कर्मचारी संपावर ठाम आहेत. स्थानकावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेवटी स्‍वारगेट पोलिसांनी मध्यस्थी करून कर्मचाऱ्यांना शांत केले.

स्वारगेट स्थानकातून सोडलेल्या गाड्या
सोलापूर - २
पंढरपूर - १

स्वारगेट स्थानकातून गाड्या सोडण्यासाठी इतर आगारातील चालकांना बोलावले होते. कोणताही कर्मचारी बाहेरचा नव्हता. तसेच ते अनुभवी चालक आहेत. एसटीच्याच तीन चालकांमार्फत आम्ही स्वारगेट स्थानकातून तीन गाड्या सोडल्या आहेत. यातील २ गाड्या सोलापूरला तर एक गाडी पंढरपूरला रवाना झाली.
- सचिन शिंदे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट एसटी स्थानक

एसटी प्रशासन हुकूमशाही करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहे. स्वारगेट स्थानकातून एकही कर्मचारी संपातून बाहेर पडलेला नाही. एसटी महामंडळाच्या चालकांचा आमचा विरोध नाही. जर प्रवाशांचे काही बरे वाईट झाले तर त्याला एसटी प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल.
- संजय मुंढे, एसटी कर्मचारी.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top