कामगारांना लशीचा दुसरा डोस तातडीने द्या ः जिल्हाधिकारी

कामगारांना लशीचा दुसरा डोस तातडीने द्या ः जिल्हाधिकारी

पुणे, ता. २७ : जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमधील अधिकारी आणि कामगारांना कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस तातडीने देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ऑनलाइन बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख, अविनाश हदगल, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते. ‘एमसीसीआयए’च्या सहकार्याने या ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते. डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व उद्योग आणि औद्योगिक आस्थापनांमधील सर्व अधिकारी आणि कामगारांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. आकडेवारीनुसार औद्योगिक आस्थापनांमधील अजूनही दुसरी मात्रा न घेतलेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्यात यावे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असले, तरी त्यांनाही लशीचा दुसरा डोस दिला जाईल, याची खबरदारी संबंधित आस्थापनांनी घ्यावी.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com