दुसऱ्या डोस घेण्याची मुदत संपली?

दुसऱ्या डोस घेण्याची मुदत संपली?

पुणे, ता. ११ : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस झाल्यानंतर ठराविक मुदतीमध्ये दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे. मात्र, दुसरा डोस घेण्यास विलंब झाल्याने मुदत संपलेली आहे. अशा नागरिकांनी गोंधळून किंवा घाबरून न जाता, महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
महापालिकेतर्फे कोरोनाचा प्रतिबंधक कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लस नागरिकांना दिल्या जात आहेत. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस झाल्यानंतर २८व्या दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागतो. तर कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर १२ ते १६ आठवड्यामध्ये दुसरा डोस घेता येतो. केंद्राकडे कोव्हिशिल्ड लस मुबलक उपलब्ध असल्याने याचेच जास्त लसीकरण झाले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांत मोठ्याप्रमाणात लसीकरण झाले. या नागरिकांनी कोव्हिशिल्डची ८४ ते ११२ दिवसांच्या दरम्यान लस घेणे आवश्‍यक होते. मात्र, अद्याप सुमारे ३ लाख लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. आता ओमिक्रॉम विषाणूंमुळे रोज हजारो नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे लस न घेतलेल्या नागरिकांची पुन्हा लसीकरण केंद्राकडे पावले वळत आहेत, पण अनेकांना आपल्याला लस मिळणार का? याबाबत संभ्रम आहे.

नागरिकांना पहिल्या डोसनंतर कोरोना झाला किंवा अन्य कारणामुळे दुसरा डोस घेतला नाही. अशा नागरिकांना आता दुसरा डोस घेण्यासाठी कोणतीही अडचण नाही. त्यांची कोविन ॲपवर नोंदणी झालेली असल्याने व पहिल्या डोसची नोंदही असल्याने दुसरा डोसही मिळू शकतो.
-डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महानगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com