महिलांसाठी राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

महिलांसाठी राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

Published on

महिलांसाठी
एकपात्री स्पर्धा
पुणेः एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्यातर्फे श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ केवळ महिलांसाठीच्या राज्यस्तरीय ‘श्यामल करंडक एकपात्री अभिनय स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी १२ व १३ फेब्रुवारीला तर अंतिम फेरी २० फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष दीपक रेगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्यामल कुलकर्णी यांच्या कन्या अनुजा कोल्हटकर, स्पर्धा संयोजक पल्लवी परब-भालेकर, एकपात्री कलाकार परिषदेचे मकरंद टिल्लू, दिलीप हल्याळ, चैताली माजगावकर-भंडारी, अनुपमा कुलकर्णी व निळू फुले कला अकादमीचे विश्वस्त सुरेश देशमुख उपस्थित होते. या स्पर्धेत १८ वर्षे वयावरील महिलांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेची प्रवेश शुल्क २०० रुपये असून ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी व स्पर्धेसंबधीच्या सविस्तर माहितीसाठी ९९६७५८२८२५ अथवा ९०११३४३५१३ क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com