शिष्यवृत्तीच्या लाभासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्तीच्या लाभासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
शिष्यवृत्तीच्या लाभासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्तीच्या लाभासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : उच्च शिक्षण संचालनालयाच्या केंद्र सरकार पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात लाभ घेण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा केंद्र सरकार पुरस्कृत शिष्यवृत्तीचा www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरुन लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top