पानिपत शौर्यदिन शुक्रवारी साजरा करणार

पानिपत शौर्यदिन शुक्रवारी साजरा करणार

पुणे, ता. ११ : मराठ्यांच्या शौर्य दिनाचे प्रतीक म्हणून गेली २६१ वर्षे पानिपत येथे ‘पानिपत शौर्य दिना’चे आयोजन करण्यात येते. या धर्तीवर यंदाही वानवडी (शिंदे छत्री) येथे शुक्रवारी (ता. १४) दुपारी चार वाजता २६२ वा पानिपत शौर्य दिन साजरा करण्यात येणार आहे.
पानिपतच्या युद्धात पवित्र भूमीत वीर मराठ्यांनी आपले रक्त सांडले. या पवित्र मातीच्या कलशाचे पूजन आणि शूरवीरांना अभिवादन या वेळी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार मर्यादित स्वरूपात हा कार्यक्रम होईल. पानिपतच्या शौर्याचा इतिहास तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावा, हा कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे, अशी माहिती पानिपत शौर्य दिन समितीचे प्रमुख उत्तमराव शिंदे-सरकार यांनी दिली.
ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, धर्मादाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के, राज्य गुन्हे अन्वेषणचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप, सिंधिया देवस्थानचे कुलमुखत्यार यशवंत भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, कर्नल सुरेश पाटील (निवृत्त), उद्योजक रमेश कावेडिया आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com