तब्बल ४० हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

तब्बल ४० हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

पुणे, ता. ११ : वीजबिलांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणने पुणे परिमंडलातील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरु केली आहे. गेल्या महिन्याभरात पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील ४० हजार ८५३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामध्ये पुणे शहरातील २१ हजार ३४७ थकबाकीदारांचा समावेश आहे.

वारंवार आवाहन करूनही वीज थकबाकी बिलाचा भरणा ग्राहकांकडून होत नसल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच हवेली ग्रामीण भागासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी व वेल्हे तालुक्यातील घरगुती सात लाख ३७ हजार ३६० ग्राहकांकडे १५७ कोटी ४६ लाख, वाणिज्यिक एक लाख ८०२ ग्राहकांकडे ५३ कोटी ८३ लाख व औद्योगिक १६ हजार ४६७ ग्राहकांकडे २५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. या मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. तसेच, या वीजजोडण्यांची सायंकाळनंतर विशेष तपासणी करण्यात येत आहे. शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

घरबसल्या भरा वीजबिल
घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइट व मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली असल्याचे महावितरणने कळविले आहे.

एवढ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
२१ हजार ३४७
पुणे शहर

पाच हजार ६५०
पिंपरी चिंचवड

१३ हजार ८५६
हवेली ग्रामीण, मुळशी, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, मावळ व खेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com