पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार
Published on

पुणे, ता. २८ : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. कात्रज बाह्यवळण मार्गावर मंतरवाडी व लोहगाव येथे हे अपघात झाले.

ऊरळी देवाची परिसरातील मंतरवाडी कात्रज बाह्यवळण मार्गावर वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करत आहे.

लोहगाव येथील फॉरेस्ट पार्कजवळ टेम्पोची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सुनील रखमाजी थोपटे (वय ५६, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत नितीन अशोक थोपटे (वय ४०, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक एम. यू. बिडवे तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Regulatory Crackdown: Violation of Environmental Norms
Phased Traffic Implementation Schedule
The Encounter: Tactical Response and Self-Defense
young girl kidnapping
Marathi News Esakal
www.esakal.com