फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा

फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा

फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा

पिंपरी, ता. २९ : थकीत कर्जाची रक्कम, बँकेकडून झालेला दंड व इतर खर्चाची रक्कम परत न देता एकाची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी दादासाहेब धनाजी साबळे (रा. मामुर्डी, देहूरोड ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बालाजी मधुकर खंकाळ (वय ३२, रा. चंद्रभागा कॉलनी, थेरगाव ), शिवाजी मधुकर खंकाळ (वय ३०, रा. उंचेठाण, ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, सोलापूर ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना त्यांची मोटार परत दिल्यानंतर त्यांना द्यावयाची थकीत कर्जाची रक्कम तसेच आयडीबीआय बँकेकडून झालेला दंड, इतर खर्च व डीव्हीडी म्युझिक सिस्टीम असे एकूण दोन लाख ९८ हजार ६१३ रुपये परत दिलेले नाहीत. फिर्यादीने वारंवार फोन करूनही उचलत नाहीत. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
---------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com