मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे आज नऱ्हेत भूमीपूजन

मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे आज नऱ्हेत भूमीपूजन

पुणे, ता. १२ : महापालिकेत समाविष्ट ११ गावांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याच्या योजनेतील महत्त्वाचा भाग असणाऱ्या मैलावाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन उद्या (ता. १३) सकाळी ११ वाजता नऱ्हे गावात होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
शिवणे, संपूर्ण उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रूक, उंड्री, उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), लोहगाव आदी गावांचा यामध्ये समावेश असून मल:निसारण व्यवस्थेचा मास्टर प्लॅन या सर्व गावांसाठी महत्त्वाचा भाग ठरणार आहे.
मोहोळ म्हणाले, ‘‘समाविष्ट गावांसाठीची कामे चार वर्षांत राबविण्याचे नियोजन केले आहे. त्या अंतर्गत ११ गावांमध्ये १८२ किलोमीटर लांबीची मलवाहिनी विकसित करण्यात येत आहे. तसेच मुंढवा येथे १२ एमएलडी क्षमतेचा आणि मांजरी बुद्रूक येथे ९३.५ एमएलडी क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहेत. यात मांजरी प्रकल्पास उरुळी देवाची, उंड्री, फुरसुंगी, मांजरी तर मुंढवा प्रकल्पास केशवनगर, साडेसतरानळी, हडपसर (उर्वरित) हा भाग जोडला जाणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com