बापलेकाचा खून करून हल्लेखोर कारमधून पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापलेकाचा खून करून हल्लेखोर कारमधून पसार
बापलेकाचा खून करून हल्लेखोर कारमधून पसार

बापलेकाचा खून करून हल्लेखोर कारमधून पसार

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या वडिलांचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. दोघांचा खून करून हल्लेखोर कारमधून पसार झाले आहेत. बुधवारी (ता. १२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
सनी कुमार शिंदे (वय २२) आणि त्याचे वडील कुमार मारुती शिंदे (वय ५५, दोघे रा. शिंदे वस्ती, लोणीकंद, नगर रस्ता) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. गेल्या वर्षी सनी शिंदे आणि साथीदारांनी लोणीकंद परिसरात सचिन शिंदे याचा खून केला होता. त्या प्रकरणात सनीला तीन महिन्यांपूर्वी जामीन मंजूर झाला होता. बुधवारी (१२ जानेवारी) सायंकाळी सनी आणि त्याचे वडील कुमार कारमधून शिंदे वस्तीकडे निघाले होते. त्यावेळी कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी शिंदे यांची गाडी अडवली. त्यानंतर पाच ते सहा जणांनी सनीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. टोळक्याने सनीवर हल्ला केल्यानंतर वडील कुमार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top