कर्ज मंजुरीच्या बहाण्याने 
साडेतेरा लाखांची फसवणूक

कर्ज मंजुरीच्या बहाण्याने साडेतेरा लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. ३० : जागा विस्तारित करण्यासाठी बारा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका महिलेची तेरा लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना निगडीतील प्राधिकरण येथे घडली.
याप्रकरणी एका महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमरजित घाट (वय ४०, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) व एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीची जागा विस्तारित करण्यासाठी आरोपी अमरजित व महिलेने बँकेतून बारा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. कर्ज मंजूर करून देण्यासाठी कर्जाच्या रकमेच्या दोन टक्के कमिशन घेणार असल्याचे सांगत महिलेकडून त्यापैकी एक टक्का कमिशन बारा लाख रुपये व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी दीड लाख रुपये बँक खात्यावर घेतले. मात्र, पैसे घेऊन नंतर महिलेला कर्ज मंजूर करून न देता त्यांची फसवणूक केली. तसेच महिलेने आरोपींना कमिशनचे दिलेले पैसे परत मागितले असता आरोपींनी महिलेला खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. ‘माझ्याकडे मोक्का’तील लोक आहेत. त्यांना सांगितले तर तुझे हातपाय दिसणार नाहीत, अशी धमकी दिली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com