शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणावर कोयत्याने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणावर कोयत्याने वार
शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणावर कोयत्याने वार

शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणावर कोयत्याने वार

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः शिवीगाळ केल्याच्या रागातून टोळक्‍याने एका तरुणावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी दोघांना वारजे पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता अहिरेगावात घडली.

महेश विजय वांजळे (वय २५, रा. न्यू अहिरेगाव), शुभम कृष्णा ऊर्फ किसन मानकर (वय २४ , रा. दांगट इस्टेट, शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अन्य साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणी दत्ता वाव्हळकर (वय २५, रा. वारजे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ता वाव्हळकर व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दत्ताने ९ जानेवारी रोजी महेशला शिवीगाळ केली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याच रागातून महेशने साथीदारांना बोलावून दत्ताच्या डोक्‍यात कोयत्याने वार केले व त्यास गंभीर जखमी केले. या घटनेमध्ये दत्ता गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या घटनेनंतर आरोपींनी हत्यारे हातात घेऊन उंचावत आरडाओरडा केला. त्यामुळे दुकानदारांनी भीतीपोटी दुकाने तत्काळ बंद केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top