हडपसरमध्ये उच्चशिक्षित महिलेची आत्महत्या

हडपसरमध्ये उच्चशिक्षित महिलेची आत्महत्या

पुणे, ता. १३ : माहेरहून पैसे आणण्यासाठी पती व सासरच्यांकडून सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून उच्चशिक्षित महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी हडपसरमधील ड्रीम आकृती सोसायटीत घडली. कल्याणी अजितकुमार प्रधान (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी महिलेचे पती अजितकुमार प्रधान याच्यासह इतरांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कल्याणी प्रधान यांचे भाऊ पतितपाबन परिडा (वय ४२, रा. ओरीसा) यांनी फिर्याद दिली आहे. कल्याणी व अजितकुमार यांचे साडेतीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघेही उच्चशिक्षित असून, अजितकुमार खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. लग्नानंतर कल्याणीला अजितकुमार व त्याच्या कुटुंबीयांनी माहेरहून पैसे आणण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक देत होते. त्यास कंटाळून कल्याणी राहात असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com