malnutrician
malnutriciansakal

पुणे जिल्ह्यात कुपोषित बालकांमध्ये तिप्पट वाढ

पुणे जिल्ह्यातील बालकांना कोरोना संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. परिणामी गेल्या सहा महिन्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले आहे.
Summary

पुणे जिल्ह्यातील बालकांना कोरोना संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. परिणामी गेल्या सहा महिन्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) बालकांना (Children) कोरोना संसर्गाचा (Corona Infection) मोठा फटका बसला आहे. परिणामी गेल्या सहा महिन्यांत कुपोषित बालकांचे (malnourished children) प्रमाण वाढले आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ४० कुपोषित बालके आहेत. हीच संख्या जुलै २०२१ मध्ये ६६० इतकी होती. त्यामुळे जुलैपासूनच्या आतापर्यंतच्या फक्त सहा महिन्यांच्या काळात कुपोषित बालकांच्या संख्येत तिप्पट वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सद्यःस्थितीतील एकूण कुपोषित बालकांमध्ये ३८४ बालके ही अतितीव्र कुपोषित (सॅम) तर, १ हजार ६५६ बालके ही तीव्र कुपोषित (मॅम) आहेत. सर्वाधिक ८२ अतितीव्र कुपोषित बालके ही खेड तालुक्यातील असून, सर्वांत कमी केवळ आठ बालके ही पुरंदर तालुक्यातील आहेत. तीव्र कुपोषित बालकांमध्ये हवेली तालुका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या तालुक्यातील एकूण २२५ बालके ही तीव्र कुपोषित आहेत.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण डिसेंबर २०२१ च्या अखेरीस करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल गुरुवारी (ता. १३) जाहीर झाला. या अहवालातून हे उघडकीस आले आहे. दरम्यान, कुपोषित बालकांच्या संख्या वाढीस कोरोना संसर्गाबरोबरच पोषण आहारातून कमी कऱण्यात आलेले तेल आणि डाळ हे दोन घटक कारणीभूत असल्याची चर्चाही जिल्हा परिषद वतुर्ळात केली जाऊ लागली आहे.

दरम्यान, याआधी जून २०२१ मध्ये अंगणवाड्यांमधील बालकांचे कुपोषणाबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल जुलै २०२१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. या अहवालानुसार पुणे जिल्ह्यात एकूण ६६० बालके कुपोषित असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी केवळ ८१ बालके ही अतितीव्र (सॅम) कुपोषित असल्याचे आढळून आले होते. ती संख्या आता सहा महिन्यांनंतर ३८४ वर गेली आहे. यामुळे या बालकांच्या संख्येत ३०३ ने वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

malnutrician
पुण्याने नवीन कोरोना रुग्णांचा शुक्रवारी १०००० चा आकडा केला पार

जुलै महिन्यातील अहवालात ५७९ बालके ही तीव्र कुपोषित (मॅम) आढळून आली होती. ती संख्या आता १ हजार ६५६ झाली आहे. यावरून तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येतही १ हजार ७७ ने वाढ झाली आहे. या वृत्ताला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही दुजोरा दिला आहे.

अशी आहे संख्या

पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या - ४ हजार ६००

अंगणवाडीसेविकांची संख्या - ४ हजार २००

अंगणवाड्यांमधील एकूण मदतनीस - ३ हजार ५००

एकूण मिनी अंगणवाडीसेविकांची संख्या - ४००

अंगणवाड्यांमधील एकूण बालके - ३ लाख २८ हजार ६२२

जिल्ह्यातील अंगणवाडी प्रकल्पांची संख्या - २१

कुपोषित बालकांची तुलनात्मक आकडेवारी

जुलै २०२१ मधील तालुकानिहाय कुपोषित बालके (सॅम व मॅमसह)

आंबेगाव ८३

बारामती ४४

भोर २०

दौंड ३५

हवेली ११२

इंदापूर ४३

जुन्नर ७०

खेड ९८

मावळ ३४

मुळशी ५

पुरंदर ३१

शिरूर ६८

वेल्हे १७

एकूण ६६०

malnutrician
पुणे : बिल्डरांना दिलासा; प्रीमियम FSIJ शुल्क भरण्यास मुदतवाढ

जानेवारी २०२२ मधील बालके (सॅम व मॅमसह)

आंबेगाव २०५

बारामती १६१

भोर १०४

दौंड ११७

हवेली २६१

इंदापूर १५०

जुन्नर २६२

खेड २३६

मावळ २०५

मुळशी ५८

पुरंदर ५८

शिरूर १८२

वेल्हे ४१

एकूण २०४०

अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याची स्थिती आतापर्यंत आपण वजन व उंचीचे प्रमाण या जुन्या पद्धतीनुसार करत होतो. मात्र आता नवीन यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरले आहे. या तंत्रज्ञानामुळे कुपोषित बालकांची अचूक संख्या निश्‍चित झाली आहे. त्यामुळे ती वाढल्याचे दिसते आहे. शिवाय काही प्रमाणात कोरोना संसर्गाचाही परिणाम असू शकतो.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com