खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : कारागृहातील गुंडाचा सहकारी असल्याचे सांगून दुग्ध व्यावसायिकास जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली.
राजेंद्र ऊर्फ राजू विजय गायकवाड (रा. शिंदावणे) व घनश्‍याम ऊर्फ गणेश आत्माराम शिंदे (रा. कुंजीरवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अण्णासाहेब खलसे (रा. कुंजीरवाडी) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. खलसे व त्यांच्या भावाचा दुधाचा व्यवसाय आहे. आरोपींनी ४ ते ११ डिसेंबर कालावधीत खलसे यांच्या भावाला फोन केला. आपण कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी विष्णू जाधव याचे साथीदार असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी दोन लाख रुपये न दिल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..