दूरस्थ शिक्षणाद्वारे
‘एमबीए’ची संधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रवेशासाठी ३१ जानेवारीची मुदत

दूरस्थ शिक्षणाद्वारे ‘एमबीए’ची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रवेशासाठी ३१ जानेवारीची मुदत

पुणे, ता. १४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षणाद्वारे (डिस्टन्स एज्युकेशन) एमबीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी इच्छुकांना अर्ज करण्यासाठी येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळा या विभागाअंतर्गत एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या दूरस्थ अध्ययन प्रशाळेने नोकरी किंवा व्यवसाय करत एमबीए शिकण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध करून दिली आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून, त्यात चार सेमिस्टरचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांतर्गत प्रवेशासाठी किमान पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे किमान दोन वर्षाचा कामाचा अथवा व्यवसायाचा अनुभव असणारे प्रवेशासाठी पात्र राहतील, असेही मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, ऑपरेशन ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, आंत्रप्रुनरशिप मॅनेजमेंट, बिझनेस ॲनालिटिक्स, फार्मा ॲण्ड हेल्थ केअर मॅनेजमेंट, टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, बॅंकिंग मॅनेजमेंट यांसह अन्य विषयांच्या अभ्यासक्रमात एमबीए करणे शक्य होणार आहे. विद्यापीठाने कमी शुल्कात एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

या अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती http://unipune.ac.in/SoL/ या लिंकवर उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com