तळजाई वसाहत येथे टोळक्याची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळजाई वसाहत येथे टोळक्याची दहशत
तळजाई वसाहत येथे टोळक्याची दहशत

तळजाई वसाहत येथे टोळक्याची दहशत

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : तळजाई वसाहत येथे पाच जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केले. तसेच घटनास्थळी असलेल्या एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने आणि रॉडने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अजय तेजी (वय ४४, रा. पद्मावती) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० जानेवारीला रात्री साडेसात वाजता तळजाई वसाहत येथील डाळिंब चौकात घडला. त्यावेळी १६ वर्षीय मुलगा आणि त्याचा मावस भाऊ हे दोघेजण तळजाई वसाहत येथील म्हसोबा चौक येथे उभे होते. त्यावेळी आरोपींनी कोयत्याने आणि रॉडने म्हसोबा चौक येथे रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्यांची तोडफोड केली. त्यावेळी आरोपी तक्रारदाराच्या मुलाकडे आले. तू आमच्याकडे काय बघतोस, असे म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलगा आणि त्याचा मावस भाऊ तेथून पळाले. आरोपींनी त्यांचा पाठलाग करून डोक्यात आणि अंगावर ठिकठिकाणी कोयत्याने वार करून आणि लोखंडी रॉडने मारहाण त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top