कर्करोगाच्या शस्त्रक्रिया नका ढकलू पुढे शरीरातील संसर्ग वाढण्याचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोगाच्या शस्त्रक्रिया नका ढकलू पुढे

शरीरातील संसर्ग वाढण्याचा धोका
कर्करोगाच्या शस्त्रक्रिया नका ढकलू पुढे शरीरातील संसर्ग वाढण्याचा धोका

कर्करोगाच्या शस्त्रक्रिया नका ढकलू पुढे शरीरातील संसर्ग वाढण्याचा धोका

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : कर्करोगाच्या रुग्णांनो, कोरोना वाढतोय म्हणून नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलू नका. त्यामुळे कर्करोगाची गुंतागुंत वाढण्याचा धोका वाढतो, असा सल्ला कर्करोगतज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कर्करोगाच्या शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. त्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी रुग्ण पुन्हा शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आले. तोपर्यंत एका अवयवापुरता असलेल्या कर्करोगाचा शरीरातील संसर्ग वाढला होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात मर्यादा आल्या होत्या. हा मागील अनुभव लक्षात घेऊन कर्करोगाच्या शस्त्रक्रिया वेळेतच करा, असे तज्ज्ञ सांगतात.

‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुमीत शहा म्हणाले, ‘‘कोरोनाच्या काळात कर्करोगाच्या रुग्णांनी सामान्यांपेक्षा स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेतलीच पाहिजे. गर्दीत न जाणे, नियमित हात स्वच्छ धुणे, मास्क लावूनच घराबाहेर पडणे या प्रतिबंधात्मक उपाययोजना त्यांच्यासाठी जशा गरजेच्या आहेत. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे शस्त्रक्रिया करणेदेखील आवश्यक आहे. रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण असतात, त्यामुळे शस्त्रक्रिया करणे पुढे ढकलण्याचे तोटे काही रुग्णांना झाले. त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणेच शस्त्रक्रियेचे नियोजन करा.’’

रुबी हॉल क्लिनिकमधील कर्करोगतज्ज्ञ डॉ. संजय देशमुख म्हणाले, ‘‘गेल्या दोन लाटांमध्ये कर्करोगाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याच्या घटना घडल्या. त्यातून रुग्णाचा कर्करोग बळावल्याचे दिसले. त्यामुळे आता कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरीही आरोग्यसुविधा सक्षम झाल्या आहेत. कर्करोगाच्या रुग्णांनी उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये यावे. त्यांना तपासण्यासाठी, उपचारासाठी सर्व रुग्णालयांनी उत्तम सुविधा उपलब्ध केल्या आहेत.’’ प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी केली जाते. त्यानंतरच प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यात येते. आता कोरोना निदान चाचणीदेखील महागडी नाही. त्यामुळे रुग्णांनी वेळेत कर्करोगाची शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top