महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइनच विद्यापीठाची स्पष्टोक्ती; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइनच

विद्यापीठाची स्पष्टोक्ती; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरुवात
महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइनच विद्यापीठाची स्पष्टोक्ती; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरुवात

महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइनच विद्यापीठाची स्पष्टोक्ती; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरुवात

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीनंतर ऑफलाइन परीक्षांसाठी परवानगी दिली होती. मात्र, तोपर्यंत विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांची तयारी पूर्ण केल्याने कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

फेब्रुवारी व मार्च महिन्यात ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही विद्याशाखांचे वेळापत्रकही घोषित करण्यात आले आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या प्रथम सत्रातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नियमित व अनुशेषित, तसेच बहि:स्थ, श्रेणीसुधार परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन फेब्रुवारी-मार्चदरम्यान टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

...अशी असेल परीक्षा
- बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू)
- ६० प्रश्नांमधून ५० अचूक प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरणार
- विज्ञान, प्रथम वर्ष बीसीए (विज्ञान) व अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील गणित व संख्याशास्त्र विषयांसाठी ३० प्रश्न विचारले जातील. त्यातील २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरणार
- परीक्षेत तांत्रिक कारणाने खंड पडल्यास विद्यार्थ्यांना ‘सॉफ्टवेअर’मार्फत आपोआप वेळ वाढवून मिळणार
- विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतची माहिती एसएमएस व ई-मेलद्वारे देण्यात येईल

ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाची तयारी पूर्ण झाली असून, ऐनवेळी निर्णय बदलल्यास अधिक संभ्रम वाढेल. विद्यापीठाने मागील दोन वर्ष यशस्वीपणे ऑनलाइन परीक्षा पार पाडल्या असून, यंदाही काटेकोर पद्धतीने परीक्षा होणार आहेत. पुढील आठवडाभरात सर्वच विद्याशाखांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे.
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ऑनलाइन शिक्षण आणि परीक्षांमुळे योग्य मूल्यमापन होत नाही. शेवटच्या वर्षाला असल्यामुळे ऑफलाइन परीक्षा होईल, असे वाटले होते. मात्र, कोरोनाच्या प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर आता ऑनलाइन परीक्षा होत असून, त्याची आम्ही तयारी करत आहोत.
- ओम लटपटे, विद्यार्थी, विधी शाखा

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top