हॅण्डस ऑन आर्किटेक्चरल कार्यशाळा

हॅण्डस ऑन आर्किटेक्चरल कार्यशाळा
Published on

पुणे, ता. १४ ः मराठवाडा मित्र मंडळाच्या लोहगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हॉयर्नमेंट अँड डिझाईन कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने (एमएमआईडीसीओए) नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चर (नासा) यांच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळांची ऑफलाईन मालिका आयोजित केली. तिला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
होई पोल्लाई हॅण्डस ऑफ एक्सपिरियन्स या इव्हेंटचा एक भाग असलेल्या कार्यशाळा आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील अनुप्रयोगांसाठी संवेदनशील करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी स्केचिंग, फोटोग्राफी, क्ले मॉडेलिंग अशा विविध मॉड्यूल्समध्ये भाग घेतला. यजमान महाविद्यालयातील स्वयंसेवकांसह देशातील आर्किटेक्चर कॉलेजचे १५० प्रतिनिधी उपस्थित होते. ‘एमएमआईडीसीओए’च्या विभाग प्रमुख आर्किटेक्ट हेमलता बुधवार आणि न्यासाचे विद्याशाखा समन्वयक आर्किटेक्ट संवेदना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऑफलाइन व फिजिकल मोडमध्ये आयोजित ही पहिली कार्यशाळा झाली. मॉड्यूल्सच्या नेतृत्वासाठी तज्ज्ञ आर्किटेक्ट संजीव जोशी आणि संदीप खटके स्केचिंगसाठी, फोटोग्राफीसाठी ओनिल शहा, प्रभाकर सिंग, आणि आर्किटेक्ट निकिता महाजनी क्ले मॉडेलिंगसाठी आणि बांधकामासाठी आर्किटेक्ट अमृता नायडू, आर्किटेक्ट स्नेहल आमटे, आर्किटेक्ट प्रज्ञा मोरे, स्नेहा शहापूरकर आणि आर्किटेक्ट तेजस नाईक यांना आमंत्रित करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचा खूप सकारात्मक परिणाम झाला आणि विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांचा भरभरून आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Impact of Recent Rainfall on Pune Water Supply
Khadakwasla dam rainfall and water level update
Vinayak Raut thane Domestic Violence Case
Moshi garbage dump collapse family tragedy
Marathi News Esakal
www.esakal.com