पुण्यात कोरोनाग्रस्त ७.७१ टक्के
रुग्ण रुग्णालयात दाखल

पुण्यात कोरोनाग्रस्त ७.७१ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल

पुणे, ता. ७ : पुण्यात गेल्या वर्षी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हरियंटमध्ये उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ३० टक्के होते. ते यावेळी आतापर्यंत फक्त ७.७१ आहे. त्यामुळे पुणेकरांनो, तुमचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तरीही घाबरू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

शहरात सद्यःस्थितीला कोरोनाचे नऊ हजार ९२७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ९५५ (७.७१ टक्के) रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. उर्वरित सर्व रुग्ण घरात विलगीकरण होऊन उपचार घेत आहेत. त्यांना कोरोनाचे कोणतेही ठळक लक्षण दिसून येत नाही. त्यामुळे तुम्हाला कोरोना झाला असली तरीही गेल्या वर्षीच्या कोरोना लाटेच्या तुलनेत संसर्गामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.
पुण्यात दुसऱ्या लाटेत ३० टक्के रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या ३० ते ५५ या वयोगटातील नागरिकांना याच सर्वाधिक संसर्ग झाल्याची प्राथमिक माहिती रुग्णालयाकडून मिळाली. गेल्या वर्षीच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या उद्रेकात ९१ टक्के रुग्णांना श्वसन संस्थेशी संबंधित त्रास होत होता. आतापर्यंत तपासलेल्या रुग्णांमध्ये या प्रकारचा त्रास असलेले २५ ते ३० टक्के रुग्ण आहेत. तसेच, संसर्गामुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्याचे प्रमाण गेल्या लाटेत ३० टक्क्यांच्या दरम्यान होते. या लाटेत हे अल्प आहे, असे निरीक्षणही त्यांनी व्यक्त केले.

‘‘रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ आहे. मात्र, त्यात बहुतांश रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. गंभीर रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी आहे. ९२ टक्के रुग्ण घरातच विलगीकरण होऊन उपचार घेत आहेत.’’
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com