फुकट्या प्रवांशाकडून
सहा कोटी दंड वसूल

फुकट्या प्रवांशाकडून सहा कोटी दंड वसूल

पुणे : पुणे रेल्वे विभागाच्या वाणिज्य विभागाकडून गेल्या एक वर्षाच्या कालावधीत विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्याकडून ६ कोटी १४ लाखांचा दंड वसूल केला आहे. १ एप्रिल २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत तिकीट तपासणीत एक लाख ३७ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून ६ कोटी १४ लाख रुपयांचा दंडापोटी महसूल मिळविला. तसेच कोरोनामुळे रेल्वेने सामान्य (जनरल) डबे बंद केले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला प्रवास हा आरक्षित तिकीट असेल तरच करता येतो. अनेक प्रवासी विना तिकीट तसेच आरक्षित तिकीट न करता प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर रेल्वेचे अधिक लक्ष असून कारवाई केली जात आहे. या कारवाई दरम्यान तुरुंगात जाण्याचीही शिक्षा होऊ शकते. याची प्रवाशांनी काळजी घ्यावी. तसेच बेकायदेशीर प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com