कामगार आघाडीतर्फे गोयकर यांचा सन्मान

कामगार आघाडीतर्फे गोयकर यांचा सन्मान

पुणे, ता. ११ ः बिगारी कामगार ते जरबेरा फुलांचा व्यापारी असा प्रेरणादायी प्रवास समाजापुढे निर्माण केल्याबद्दल भाजप शहर कामगार आघाडीतर्फे सुनील विठ्ठल गोयकर यांचा सत्कार करण्यात आला. ‘सकाळ’ने गोयकर यांचा बिगारी ते फुलांचा व्यापारी असा प्रवास मांडला होता. या वृत्ताची दखल घेऊन कामगार आघाडीने मार्केट यार्डमध्ये जाऊन गोयकर यांचा सत्कार केला. यावेळी आघाडीचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या हस्ते सत्कार केला. असाच संघर्ष केलेला रतनसिंग राठोड यांचाही सत्कार करण्यात आला. सरचिटणीस श्‍यामराव लोंढे, अक्षय वरघडे, गणेश भोसले, अमृत देसाई, सचिन सुपेकर, योगेश शेलार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com