शाळा आजपासून पुन्हा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा आजपासून पुन्हा सुरू
शाळा आजपासून पुन्हा सुरू

शाळा आजपासून पुन्हा सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांनी मंगळवारी (ता. १) शहरातील शाळा पुन्हा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांची तयारी जवळ-जवळ पूर्ण झाली असून, शिक्षक व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या आगमनाची वाट पाहत आहे. वर्ग निर्जंतुकीकरण, शिक्षकांच्या कोविड चाचण्या आदी तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

ओमिक्रॉन प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर बंद केलेल्या राज्यातील शाळा १९ जानेवारीपासून सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, पुण्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. अखेरीस पालकमंत्री अजित पवार यांच्या कोरोना आढावा बैठकीनंतर मंगळवारी शाळा सुरू होत आहे.

...अशी आहे नियमावली
- शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार
- शाळेची वेळ केवळ चार तास
- विद्यार्थ्यांनी नाश्ता करून यायचं अन् घरी जाऊन जेवण करायचं
- मास्क काढायला लागेल अशा अॅक्टिव्हिटी टाळणार
- पालकांनी मुलांना मास्कचं बंधन करावं
- रविवारी आणि सोमवारी शाळा निर्जंतुक कराव्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा सुरू करण्याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. शाळांचे निर्जंतुकीकरण झाले आहे. उद्या मुलांचे स्वागत मास्क आणि चॉकलेट देऊन करणार आहोत.
- मंगला चौधरी, मुख्याध्यापिका, वीर शिवाजी मराठा जिजामाता मुलींचे विद्यालय, शुक्रवार पेठ

PNE22S39373

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top