पुणे शहरात ५३ टक्के पुरुष कोरोना पॉझिटिव्ह
महिलांच्या तुलनेत प्रमाण अधिक

पुणे शहरात ५३ टक्के पुरुष कोरोना पॉझिटिव्ह महिलांच्या तुलनेत प्रमाण अधिक

पुणे, ता. ११ : पुणे शहरात गेल्या ४१ दिवसांमध्ये सरासरी ३२९ पुरुषांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्या तुलनेत महिलांची सरासरी २८६ आहे. शहरात १ डिसेंबर २०२१ ते ११ जानेवारी २०२२ या 41 दिवसांमध्ये २५ हजार ८६२ रुग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे. त्यापैकी १२ हजार ३३ महिला (४७ टक्के) असून १३ हजार ८२४ पुरुष (५३ टक्के) असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

पुरुष कामानिमित्त घराबाहेर पडतात. वेगवेगळ्या लोकांना भेटतात. त्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे, असे निरीक्षण नोंदण्यात आले आहे. शहरात जानेवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. पुरुष आणि महिला यांच्या प्रमाणात फारशी तफावत नाही. १ ते ३१ डिसेंबरदरम्यान एक हजार ६४१ महिलांना कोरोना झाला होता. तर, त्या तुलनेत एक हजार ८७६ पुरुषांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १ ते ११ जानेवारीदरम्यान ११ हजार ९४८ पुरुष आणि १० हजार ३९१ महिलांना कोरोना झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com