पुणेकरांना दुपारनंतर सूर्यकिरणांचे दर्शन

पुणेकरांना दुपारनंतर सूर्यकिरणांचे दर्शन

पुणे, ता. १२ ः पहाटेपासून पडलेले दाट धुके आणि आकाशातील ढगांच्या चादरीमुळे पुणेकरांना बुधवारी दुपारनंतर सूर्यकिरणांचे दर्शन झाले. किमान तापमानात झालेली घट आणि अंशतः ढगाळ हवामानामुळे पुणे शहरात पहाटे कडाक्याची थंडी पडली होती. तर दुपारपर्यंत बहुतेक भागांत बोचरी थंडी अनुभवायला मिळाली. बुधवारी सकाळी शहरातील सरासरी किमान तापमान ११.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
पुणे शहर व परिसरात पुढील आठवडाभर तरी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे निदान आठवडाभर तरी दाट धुकं आणि दुपारपर्यंतची बोचरी थंडी पुणेकरांना अनुभवावी लागणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात हवामान कोरडे असले तरी विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडत आहे. त्याचा परिणामही राज्यातील इतर भागातील हवामानावर जाणवत आहे. कोकण-गोव्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर विदर्भ मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमान वाढले आहे. उर्वरित राज्यात ते सरासरीच्या जवळ होते. पुणे शहर आणि परिसरातही सरासरीच्या आसपास किमान तापमान राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बुधवारी सकाळी किमान तापमान (अंश सेल्सिअस)
शिवाजीनगर ः ११.४
लोहगाव ः १३.३
पाषाण ः १२.३
चिंचवड ः १५.६
लवळे ः १४.२
मगरपट्टा ः १६.२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com