वडेट्टीवार यांनी ‘महाज्योती’ची वाट लावली ः कोंढरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडेट्टीवार यांनी ‘महाज्योती’ची वाट लावली ः कोंढरे
वडेट्टीवार यांनी ‘महाज्योती’ची वाट लावली ः कोंढरे

वडेट्टीवार यांनी ‘महाज्योती’ची वाट लावली ः कोंढरे

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः शासनाची कोणतीही सार्वत्रिक योजना स्वतःच्या मतदारसंघात राबवता येत नाही; असे असतानादेखील इतर मागासवर्ग, आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘महाज्योती’मार्फत योजना स्वतःच्या जिल्ह्यात व मतदारसंघात राबवून एका चांगल्या उपक्रमाची वाट लावण्याची मुहूर्तमेढ रोवली आहे, असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी केला आहे.

वडेट्टीवार ‘सारथी’च्या नावाने ओरडत होते. तसेच ते अजूनही सारथीची चौकशीच करीत आहेत. सारथी सुरू झाल्यापासून सात महिन्यांत १७ उपक्रम सुरू झाले आहेत. तसेच २२ उपक्रम शासनाच्या मान्यतेसाठी पाठविले होते. ते त्यांना सहन झाले नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी सारथीने ज्या २२५ विद्यार्थ्यांचे दिल्लीत प्रयोजन केले होते. त्याला वडेट्टीवारांनी विरोध केला होता. त्यातील २२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. महाज्योती स्थापन झाल्यापासून तसेच वडेट्टीवार हे स्वतः अध्यक्ष होऊनही स्वायत्त असलेल्या महाज्योतीला एकही प्रभावी उपक्रम सुरू करता आला नाही. तसेच पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक आणि पुरेसे मनुष्यबळदेखील नेमता आले नाही. ज्या योजना बहुजन कल्याण किंवा कृषी विभागाकडून राबविणे आवश्यक आहेत. त्या योजना वडेट्टीवार महाज्योतीकडून राबवत आहेत, असेदेखील कोंढरे यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top