स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 
७५ कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प
समाविष्ट तेवीस गावांत पाणीबाणी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प गीता परिवार, क्रीडा भारती, पतंजली योगपीठ परिवार, हार्टफुलनेस संस्था आणि नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन या पाच संस्थांतर्फे करण्यात आला असल्याची माहिती पतंजली योगपीठाचे राज्य प्रभारी बापू पाडळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गीता परिवारचे सत्यनारायण मुंदडा व क्रीडा भारतीचे मिलिंद डांगे उपस्थित होते.

या उपक्रमासाठी केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय व क्रीडा मंत्रालय सहकार्य करणार असून, शिक्षण मंत्रालय, संस्कृती मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयही यामध्ये सहभागी होणार आहे. या संकल्पाचा आरंभ स्वामी रामदेव, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हरिद्वारच्या पतंजली योगपीठात वातावरणात झाला. या संकल्पात सहभागी होण्यासाठी यासंबधीच्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी व ५ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत २१ दिवस दररोज १३ सूर्यनमस्कार घालून आपल्या नोंदणी क्रमांकानुसार त्याची नोंदणी वरील संकेतस्थळावर करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या माध्यमातून विश्वविक्रम करण्याची योजना असून, या उपक्रमात सुमारे ३० हजार शैक्षणिक संस्था आणि किमान ३० लाख योगसाधक, विद्यार्थी सहभागी होतील असा अंदाज आहे. सर्व सहभागी योगसाधकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे पाडळकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top