पूना हॉस्पिटलतर्फे महापालिकेला लशीचे पाच हजार डोस
पुणे, ता. ३१ : पूना हॉस्पिटलतर्फे महापालिकेला कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लशीचे पाच हजार डोस देण्यात आले. हॉस्पिटलकडे लशीचा साठा होता. त्यामुळे महापालिकेला लसीकरण मोहिमेमध्ये योगदान म्हणून ही लस देण्यात आली.
या बाबत पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष देविचंद जैन म्हणाले, ‘‘कोरोना उद्रेकापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक लस हे एकमेव प्रभावी आयुध आपल्याजवळ आहे. त्यासाठी रुग्णालयाने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशिल्ड ही लस विकत घेतली होती. सुरवातीच्या टप्प्यात मोठ्या संख्येने पुणेकरांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घेतली. रुग्णालयाकडे पाच हजार लशीचे डोस शिल्लक होते. महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यात योगदान देण्यासाठी ही लस महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली.’’
पूना हॉस्पिटलने महापालिकेला पाच हजार लशीचे डोस दिले असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. या डोसमुळे लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहरातील बहुतांश रुग्णालयांमधून लसीकरण सुरू होते. त्यासाठी लशीचे हजारो डोस कंपनीकडून खरेदी केले. त्यानंतर खासगी रुग्णालयांमधील लसीकरणाचा वेग मंदावला. खरेदी केलेल्या लशी पुढील महिना ते दोन महिन्यात वापरण्याची मुदत संपत आहे, अशी माहिती विविध खासगी रुग्णालयांकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.