विद्यापीठ संशोधन, नवनिर्मितीचे
इंजिन : डॉ. जी. सतीश रेड्डी

विद्यापीठ संशोधन, नवनिर्मितीचे इंजिन : डॉ. जी. सतीश रेड्डी

पुणे, ता. ९ : ‘‘विद्यापीठे तंत्रज्ञानातील संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावत असतात. विद्यापीठाने पायाभूत सुविधा मजबूत करून विविध क्षेत्रात सखोल संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे, तरच भारत तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करेल. विद्यापीठ ही संशोधन आणि नवनिर्मितीचे इंजिन असते,’’ असे मत ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थ’चे (डीआरडीओ) अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या चौथ्या पदवी प्रदान समारंभात डॉ. रेड्डी बोलत होते. यावेळी खासदार अपराजिता सारंगी, परिवहन मंत्री अनिल परब, ‘एमआयटी’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दोन हजार २०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. यात १३ विद्याशाखांमधील ४४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, तर आठ विद्यार्थ्यांना पीएच.डी प्रदान केली.
ऑनलाइनद्वारे बोलताना डॉ. रेड्डी म्हणाले,‘‘भारताकडे सर्वात शक्तिशाली संरक्षण यंत्रणा असून जगात अत्याधुनिक सशस्त्र-अस्त्र असणाऱ्या देशात भारताचा समावेश होतो. विद्यार्थ्यांकडे चांगली कल्पना, डिझाईन व संरक्षण उत्पादन निर्मितीसाठी नवे तंत्रज्ञान असल्यास डीआरडीओमार्फत निधी देण्यात येते. सध्या डीआरडीओ तीनशेहून अधिक शैक्षणिक संस्थांसोबत तंत्रज्ञानावर आधारित संशोधनावर काम करत आहे.’’ यावेळी डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. मंगेश कराड यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रा. स्नेहा वाघटकर आणि डॉ. अशोक घुगे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com