राज्यात १३ दिवस पुरेल इतकाच कोव्हॅक्सिन लशीचा साठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात १३ दिवस पुरेल इतकाच कोव्हॅक्सिन लशीचा साठा
राज्यात १३ दिवस पुरेल इतकाच कोव्हॅक्सिन लशीचा साठा

राज्यात १३ दिवस पुरेल इतकाच कोव्हॅक्सिन लशीचा साठा

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लशीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे पुढील १३ दिवस पुरेल इतकाच लशीचा साठा शिल्लक राहिला आहे.
देशात गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाले. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लस हा एकमेव प्रभावी मार्ग आहे. राज्यात ९१ टक्के नागरिकांनी पहिली लस घेतली तर, अवघ्या ६७ टक्के जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहे. या पार्श्वभूमिवर कोव्हॅक्सिन लशीचा तुटवडा राज्यात निर्माण झाला आहे.
राज्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लशीचा नियमित पुरवठा होत आहे. त्यामुळे कोविशिल्ड लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, भारत बायोटेकच्या कोविशिल्डचे फक्त १३ लाख डोस राज्यात शिल्लक आहेत. राज्यात दररोज कोविशिल्डचे सुमारे ८० हजार ते एक लाख डोस नागरिक घेतात. त्यामुळे जेमतेम पुढील १३ दिवस पुरेल इतकाच साठा राज्यात शिल्लक आहे.
राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले, ‘‘राज्यात कोव्हॅक्सिन लशीचे डोसचा पुरवठा झालेला नाही. ही लस मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.”

लस ....................... लशीचे डोस
कोविशिल्ड ............ १२ कोटी ६५ लाख ५६ हजार ४५९
कोव्हॅक्सिन ............. दोन कोटी १४ लाख २८ हजार ६००
स्पुटनिक ................ दोन लाख ६२ हजार १४१

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top