कॉसमॉस बँकेची यशोगाथा आज साम टीव्हीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉसमॉस बँकेची यशोगाथा आज साम टीव्हीवर
बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण

कॉसमॉस बँकेची यशोगाथा आज साम टीव्हीवर

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : सहकार क्षेत्रातील लखलखता तारा असलेल्या कॉसमॉस बँकेची यशोगाथा ‘महाब्रँड्स’मधून मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय ब्रँड्सना सलाम करणाऱ्या या कार्यक्रमात मंगळवारी (ता. १८) दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी कॉसमॉस बँकेचा प्रवास साम टीव्हीवर दाखविण्यात येणार आहे. महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात सहकारी बँकिंग क्षेत्राचीही पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. महाराष्ट्रात याचा प्रसार करण्यात यात मोलाचा वाटा आहे तो कॉसमॉस बँकेचा. ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही उक्ती सार्थ ठरवत सर्वसामान्य ग्राहकाला पिढ्यानपिढ्या विश्वासाच्या नात्याने जोडून ठेवणारी शतकोत्तर परंपरा असणारी ही बँक महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही आपला विस्तार करत आहे. त्यामुळे ही बँक खऱ्या अर्थाने ‘महाब्रँड’ आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top