
‘एएफकॅट’चे प्रवेशपत्र जाहीर
पुणे, ता. ३१ ः भारतीय हवाईदलाच्या वतीने घेण्यात येणारी ‘एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट’ (एएफकॅट) या प्रवेश प्रक्रियेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरलेल्या उमेदवारांना हवाईदलाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील.
हवाईदलाच्या विविध विभागात अधिकारीपदासाठी महिला व पुरुष उमेदवारांसाठी ही प्रवेश प्रक्रिया वर्षातून दोन वेळा घेण्यात येते. यामध्ये लेखी आणि हवाईदलाची सर्व्हिस सिलेक्शन मुलाखती (एएफएसबी) अशा दोन टप्प्यात प्रक्रिया पूर्ण होते. तर सध्या या प्रवेशांतर्गत एकूण ३१७ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान ही परीक्षा येत्या १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणार असून यासाठी पुणे, मुंबई, नाशिकसह देशातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी किंवा याबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी afcat.cdac.in/AFCAT या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..