पुण्यात कोव्हॅक्सिन खडखडाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात कोव्हॅक्सिन खडखडाट!
पुण्यात कोव्हॅक्सिन खडखडाट!

पुण्यात कोव्हॅक्सिन खडखडाट!

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : शहरात कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लशीचा साठा संपत आला आहे. जेमतेम येत्या एक दिवस पुरेल इतकाच लशीचा साठा महापालिकेत शिल्लक आहे. त्या आधारावर मंगळवारी (ता. १) शहरातील आठ शाळांमधील १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लस उपलब्ध केली आहे.
राज्याकडून महापालिकेला लस वितरण करण्यात येते. कोव्हॅक्सिन लशीचा गेल्या काही दिवसांपासून पुरवठा झालेला नाही. त्यामुळे शहरातील कोव्हॅक्सिन लशीच्या केंद्रांची संख्या कमी करण्यात आली. आता या लशीचे जेमतेम दोन हजार १०० डोस शिल्लक आहेत. मंगळवारी शाळांमधून होणाऱ्या लसीकरणात हे डोस संपतील. त्यानंतर बुधवारी किशोरवयीन मुलांसाठीही कोव्हॅक्सिन उपलब्ध होणार नाही.
पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘कोव्हॅक्सिन ही लस आता केंद्रांवर उपलब्ध नाही. केवळ किशोरवयीन मुलांसाठी ही शिल्लक लस उपलब्ध करण्यात आली आहे. शहरात मंगळवारी कोव्हॅक्सिनचा पुरवठा झाल्यास बुधवारी (ता. २) लस नागरिकांसाठी देता येईल. त्यासाठी सरकारने तातडीने कोव्हॅक्सिनचा पुरवठा केला पाहिजे.’’
शहरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण सुरू झाले. पहिल्या दिवशी लस घेतलेल्या मुलांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस द्यावा लागणार आहे. त्यामुळे तीन जानेवारीला पहिला डोस घेतलेली मुले मंगळवारी लसीकरण केंद्रांवर येतील. त्यांना लस द्यायची कशी, असा प्रश्न राज्याच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना पडला आहे.

परीक्षेच्या आधी लसीकरण पूर्ण होईल, या उद्देशाने सुरुवातीलाच लस घेतली होती. पण, आता लशीचा दुसरा डोस वेळेत मिळाला नाही, तर तो पुढे कधी घ्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सौरभ जोशी, विद्यार्थी, बारावी

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top