मानसिक स्वास्थ्य, समस्यांसाठी हक्काचे व्यासपीठ ‘सकाळ सोबत बोलूया हेल्पलाइन’ला राज्यभरातून प्रतिसाद; शहरी भागातून सर्वाधिक ५८.८ टक्के कॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानसिक स्वास्थ्य, समस्यांसाठी हक्काचे व्यासपीठ 
‘सकाळ सोबत बोलूया हेल्पलाइन’ला राज्यभरातून प्रतिसाद; शहरी भागातून सर्वाधिक ५८.८ टक्के कॉल
मानसिक स्वास्थ्य, समस्यांसाठी हक्काचे व्यासपीठ ‘सकाळ सोबत बोलूया हेल्पलाइन’ला राज्यभरातून प्रतिसाद; शहरी भागातून सर्वाधिक ५८.८ टक्के कॉल

मानसिक स्वास्थ्य, समस्यांसाठी हक्काचे व्यासपीठ ‘सकाळ सोबत बोलूया हेल्पलाइन’ला राज्यभरातून प्रतिसाद; शहरी भागातून सर्वाधिक ५८.८ टक्के कॉल

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्यावतीने ‘वीई आर इन धीस टुगेदर’ (we are in this together) या मोहिमेअंतर्गत मानसिक ताण-तणाव व्यवस्थापन, मानसिक स्वास्थ्य आणि समस्येबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ ही चोवीस तास मोफत हेल्पलाइन मागील सोळा महिन्यांपासून सुरु आहे. कर्वे समाज सेवा संस्थेच्या ‘सेंटर फॉर मेंटल हेल्थ ॲण्ड डीसअँबीलीटीज’च्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या हेल्पलाइनमुळे लोकांना व्यक्त होण्यासाठी व मार्गदर्शनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. राज्यभरातून आतापर्यंत साडेअकरा हजारांहून अधिक लोकांनी या हेल्पलाइनवर संवाद साधला आहे.

तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्र तज्ज्ञ यांची टीम या हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देऊन त्यांचे मोफत समुपदेशन करत आहे. हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये पुरुषाचे प्रमाण ६४.६ टक्के, तर महिलांचे प्रमाण ३५ टक्के आहे. यात अठरा वर्षांच्या तरुणांपासून सत्तरपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शहरी भागातील ५८.८ टक्के, निमशहरी भागातील ३३.८ टक्के, तर ग्रामीण भागातील ७.३ टक्के लोकांनी या हेल्पलाइनवर आतापर्यंत संवाद साधला आहे.

कॉल करणाऱ्यांमध्ये खासगी नोकरदार वर्गाचे प्रमाण पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर गृहिणी आणि तिसऱ्या क्रमांकावर विद्यार्थी वर्गाचे प्रमाण आहे. सेवानिवृत्त, व्यावसायिक, शासकीय नोकरदार, लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या व्यक्ती, बेरोजगार व्यक्ती, शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार या वर्गांचेही मदतीसाठी फोन करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

हेल्पलाईनवर काळजी, ताण-चिंता व आत्महत्येच्या विचारामुळे येणारे नैराश्य यासंदर्भातील कॉलचे प्रमाण ४७.२ टक्के आहे. नातेसंबंधातील ताण-तणाव व वैवाहिक सहजीवनामधील समस्या यांचे प्रमाण १६.९ टक्के आहे. नोकरी व व्यवसायातील आर्थिक अडचणींमुळे आलेले नैराश्याचे प्रमाण १२.२ टक्के आहे. आनुवंशिक आजार, मानसिक व शारीरिक आरोग्याच्या समस्यांमुळे आलेले नैराश्य या संदर्भातील कॉलचे प्रमाण ८.३ टक्के आहे.


एखादी व्यक्ती हेल्पलाइनवर जेव्हा फोन करते, तेव्हा त्या व्यक्तीला परिस्थितीचा स्वीकार कसा करावा हे आम्ही समजावून सांगतो. आपल्याला नीट दिसत नसले, तर जितक्या सहजतेने आपण डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातो, याच सहजतेने आपल्याला मानसिक आधाराची गरज आहे, या गोष्टीचा त्यांनी स्वीकार कसा करावा याबाबत मार्गदर्शन करतो. फोनवरून मानसिक आधार देत कॉलरच्या विचार-भावनांच्या व्यवस्थापनात घडणारा सकारात्मक बदल हेच या हेल्पलाइनचे यश आहे.
-शिल्पा तांबे, समुपदेशक

या क्रमांकावर साधा संपर्क
‘सकाळ सोबत बोलूया’ उपक्रमासाठी ०२०- ७११७१६६९ या क्रमांकावर फोन करून आपण मनमोकळेपणाने आपली समस्या मांडू शकता. आपली व्यक्तिगत माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.


‘वीई आर इन धीस टुगेदर’ या मोहिमेच्या वेबसाइटला भेट देण्यासाठी पुढील क्युआर कोड स्कॉन करा.
-QR code ३५८४१

समुपदेशनासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट
काही लोकांना सातत्याने समुपदेशन व मार्गदर्शनाची गरज असते. या पार्श्वभूमीवर मानसिक समस्यांवर सर्व वयोगटातील नागरिकांसाठी नाममात्र सशुल्क दरात तज्ज्ञ समुपदेशकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी we are in this together या वेबसाईटद्वारे ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खालील लिंक ओपन करून आपली व्यक्तिगत माहिती भरून आपण अपॉईंटमेंट बुक करू शकता.
लिंक : www.waitt.in/therapy/

३५८३९

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top