पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयात मोफत लसीकरण मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयात मोफत लसीकरण मोहीम

पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयात मोफत लसीकरण मोहीम

पुणे : स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात मोफत लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली.(Free vaccination campaign at Ferguson College)

हेही वाचा: Netflix चा वापरकर्त्यांना झटका; मात्र, भारतीयांसाठी आनंदाची बातमी

याप्रसंगी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, महानगरपालिकेचे लसीकरण प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर, हेन्कल इंडिया लिमिटेडचे डॉ. प्रसाद खंडागळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मोहिमेचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंग परदेशी, उपप्राचार्य नारायण कुलकर्णी, पालक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष संदीप जोशी, श्री ज्ञान योग सेवा ट्रस्टचे संस्थापक डॉ. राजेंद्र खेडेकर, भारतीय युवक कल्याण व व्यायाम केंद्राचे रवी ननावरे, विकास माने, संजय तांबे, आनंद लोंढे यांनी केले. या लसीकरण मोहिमेत जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेत शिकणाऱ्या जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आश्वासन डॉ. देवकर यांनी दिले आहे.(Pune News )

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top