‘मिस इंडिया’च्या बदनामीची पोलिस चौकशी करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मिस इंडिया’च्या बदनामीची पोलिस चौकशी करणार
‘मिस इंडिया’च्या बदनामीची पोलिस चौकशी करणार

‘मिस इंडिया’च्या बदनामीची पोलिस चौकशी करणार

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : मिस इंडिया असलेली मुलगी तिच्या फॅशन डिझायनर आईबरोबर सोसायटीमध्ये घाण करत असल्याचा आरोप असलेली नोटीस सोसायटीच्या दर्शनी भागात लावणे सोसायटीला महागात पडणार आहे. या नोटिशीमुळे बदनामी झाली म्हणून मायलेकीने न्यायालयात धाव घेतल्यावर या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

शहरातील एका नामांकित सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. तक्रारदार महिला या फॅशन डिझायनर (वय ४२) असून त्यांची मुलगी मिस इंडिया (वय २५) राहिली आहे. त्या राहत असलेल्या सोसायटीतील काही सभासदांनी संबंधित महिला या सोसायटीमध्ये घाण करतात, सॅनिटरी नॅपकिन्स बाहेर फेकतात, सदनिका घाण करतात, त्यांची कुत्री रस्त्यावर घाण करतात, या स्वरूपाचे आरोप करणारे पत्र बनविले. त्यावर, अन्य सभासदांच्या सह्या घेऊन कारवाई का करू नये, अशी नोटीस सोसायटीच्या सर्व सभासदांना त्यांच्या ई-मेल व मोबाईलवर पाठविली. याखेरीज, सोसायटीच्या दर्शनी भागात फलकावर लावून तिची सोसायटी व इतर ओळखीच्या लोकांमध्ये बदनामी केल्याने मायलेकींनी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी अ‍ॅड. विजय राठोड यांच्या मार्फत सोसायटीचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यावर पोलिसांनी तपास करावा आणि त्याचा अहवाल ९० दिवसांच्या आत न्यायालयापुढे सादर करावा, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांनी येरवडा पोलिसांना दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top