स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने खोलीमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी नवी पेठेत घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अमर रामचंद्र मोहिते (वय ३३, रा. विठ्ठल मंदिरामागे, नवी पेठ, मुळ रा. जत, सांगली ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) कुंडलिक कायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर हा २०१० पासून केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा अभ्यास करीत होता. ‘एमपीएससी’च्या परीक्षेत तो उत्तीर्णही झाला होता. मात्र, त्याने नोकरी स्वीकारली नव्हती. दरम्यान, पाच ते सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याचा भाऊ दत्तात्रेय मोहिते हे पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक आहेत.

अमर मित्रांसमवेत नवी पेठेतील विठ्ठल मंदिरामागे असलेल्या एका वसतीगृहामध्ये राहात होता. शुक्रवारी रात्री तो एकटाच खोलीमध्ये होता. सकाळी त्याच्या खोलीतील मित्र आला. अमरने दरवाजा न उघडल्यामुळे मित्राने अमरचा भाऊ दत्तात्रेय मोहिते यांना फोन केला. त्यांनीही अमरच्या मोबाईलवर फोन लावला, परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी याबाबत विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अमर झोपलेल्या अवस्थेत पडला होता. त्याच्या खोलीत कीटकनाशकाची बाटली पडलेली. पोलिसांनी त्यास ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नैराश्‍य किंवा कौटुंबिक कारणातून अमरने आत्महत्या करण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

''सकाळ सोबत बोलूया'' हेल्पलाईनवर साधा संपर्क
मागील पंधरा महिन्यांपासून तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्रतज्ज्ञ यांची टीम ''सकाळ सोबत बोलूया'' या हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत, त्यांचे चोवीस तास मोफत समुपदेशन करत आहेत. हेल्पलाइनमुळे लोकांना व्यक्त होण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. चला तर मग, आपण ही आमच्याशी मनमोकळेपणे बोलू शकता. आपली व्यक्तीगत माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. इथे साधा संपर्क "सकाळ सोबत बोलूया" - ०२०-७११७१६६९

35914

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top