बीईजी सेंटरमधून चंदनाच्या झाडांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीईजी सेंटरमधून चंदनाच्या झाडांची चोरी
बीईजी सेंटरमधून चंदनाच्या झाडांची चोरी

बीईजी सेंटरमधून चंदनाच्या झाडांची चोरी

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः संगमवाडी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग सेंटर (बीईजी)च्या आवारातील चंदनाची सहा झाडे चोरट्यांनी कापून नेली. लष्कराची सुरक्षा भेदून चोरट्यांनी ही चोरी केली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी लष्करातील हवालदार मनजीत सिंग (वय ४६, रा. संगमवाडी, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी येथील बीईजीचे आवार प्रशस्त असून, आतमध्ये चंदनासह विविध प्रकारची झाडे आहेत. दरम्यान, गुरुवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बीईजीच्या पाठीमागील बाजूच्या भिंतीवरून आवारात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सेंटरमधील इन्स्ट्रक्‍टर वर्कशॉपच्या परिसरातील चंदनाची सहा झाडे कापून नेली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर लष्कराकडून पोलिसांना खबर देण्यात आली. तसेच या प्रकरणी फिर्यादही दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद खटके करीत आहेत. लष्कर परिसरातील सरकारी निवासस्थाने, लष्करी वैद्यकीय रुग्णालय, रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दल अशा महत्त्वाच्या ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top