पुण्यात ''न्यूड कॉलिंग''च्या घटनांचा धुमाकूळ

पुण्यात ''न्यूड कॉलिंग''च्या घटनांचा धुमाकूळ

Published on

पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १३ : खासगी कंपनीत काम करणाऱ्या ४५ वर्षीय कर्मचाऱ्यास एका तरुणीकडून व्हॉटसअ्‌प मेसेज आला. दोघांचा संवाद वाढल्यानंतर तरुणीने संबंधित व्यक्तीस व्हॉटसअप व्हिडिओ कॉल करून (न्यूड कॉल) कपडे उतरविण्यास सांगितले. त्यानुसार, त्याने कपडे उतरवून अश्लील चाळे केले. त्यानंतर तरुणी व तिच्या सहकाऱ्यांनी तोच व्हिडिओ फेसबुकवर प्रसारित करून पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांकडून "न्यूड कॉल''द्वारे खंडणी मागण्याच्या घटनांचा धुमाकूळ शहरात वाढला आहे.

एकीकडे ''सेक्‍सटॉर्शन'', तर दुसरीकडे फेसबुकवरील बदनामीमुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. मागील वर्षापासून आतापर्यंत तब्बल ६८२ जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले आहेत.

असे ओढले जाते जाळ्यात
सायबर गुन्हेगार तरुणींची छायाचित्रे व नावांचा वापर करीत व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर व अन्य समाजमाध्यमांद्वारे फ्रेंडरिक्वेस्ट, मेसेज नागरिकांना पाठवितात. नागरिक त्यावर फ्रेंडरिक्वेस्ट, मेसेज, लिंक किंवा मोबाईल क्रमांकावर तत्काळ संपर्क साधतात. त्यानंतर संबंधित तरुणी संबंधितांशी मैत्री वाढवून व्हॉटस्‌अपद्वारे व्हिडिओ कॉल करून त्यांना कपडे उतरविण्यास भाग पाडतात. त्यानंतर त्यांच्याशी लैंगिक संभाषण केले जाते. दरम्यान, संबंधित तरुणी नागरिकांचा व्हिडिओ चित्रित करीत असल्याचाही नागरिकांना विसर पडतो. त्यानंतर दुसऱ्याच अश्लील व्हिडिओ पाठवून धमकी दिली जाते. त्यानंतर तरुणींच्या साथीदारांकडून फेसबुकवर व्हिडिओ प्रसारित करून नागरीकांना धमकावून खंडणीची मागणी केली जाते. पोलिसांत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीतीही दाखविली जाते.

बदनामी व प्रतिष्ठेपोटी देतात ऑनलाइन खंडणी
फेसबुकवर व्हिडिओ प्रसारित करून संबंधित नागरिकांची बदनामी केली जाते. ती टाळण्यासाठी नागरिक सायबर गुन्हेगारांच्या धमक्‍यांना घाबरून ऑनलाइन पैसे पाठवितात. पैसे मिळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सायबर गुन्हेगार संबंधित नागरिकास आणखीनच ब्लॅकमेल करीत केले जाते. केवळ श्रीमंत कुटुंबातीलच नव्हे, तर नोकरदार, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यांनाही जाळ्यात ओढले जात आहे.
----------------------------
व्हॉटसअप "न्यूड कॉल''द्वारेच "सेक्‍सटॉर्शन''
सायबर गुन्हेगारांना प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तींचे व्हिडिओ, त्यांचे अश्लील संभाषण, मॉर्फ केलेली छायाचित्रे, व्हिडिओ नागरीकांना पाठविण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. अशा "न्यूड कॉल''द्वारे खंडणी उकळण्याचे म्हणजेच "सेक्‍सटॉर्शन''चे प्रकार घडत असल्याची सद्यःस्थिती आहे. हा प्रकार कायद्याने गुन्हा असून आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
----------------
नागरिकांना व्हिडिओ पाठवून पैसे मागितले जातात. मागील वर्षी ६८२ तक्रार अर्ज पोलिसांकडे दाखल आहेत. नागरिकांनी समाजमाध्यमांचा वापर करताना काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्तींच्या फोन, लिंक, मेसेज, व्हिडिओ कॉल, फ्रेंड रिक्वेस्टला प्रतिसाद देऊ नये.
- डी.एस.हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.
-------
पूजा नावाच्या तरुणीने व्हॉटस्‌अपद्वारे माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणी व तिच्या साथीदारांनी मला अश्लील व्हिडिओ पाठवून माझ्याकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांचीही भीती त्यांनी दाखविली.
- तक्रारदार नागरिक.
''''
* अशी घ्या काळजी
- अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका

- सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री वाढवू नका
- परिचित नसलेल्यांशी व्हॉटसअप कॉलिंगद्वारे संवाद साधू नका
- व्हिडिओ, छायाचित्रांचा समाजामध्यमांवरील वापर टाळा

------------------
इथे करा संपर्क - सायबर पोलिस ठाणे - ०२० - २९७१००९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com