हृदयात बसवला ब्ल्युटुथ असलेला पेसमेकर

हृदयात बसवला ब्ल्युटुथ असलेला पेसमेकर

Published on

हृदयाच्या कार्याबाबत माहिती मिळणार क्षणोक्षणी
ब्ल्युटुथ असलेला पेसमेकर बसविण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश
पुणे, ता. १४ : ब्ल्युटूथ असलेला पेसमेकर ४५ वर्षीच्या महिलेच्या हृदयात बसविण्यात आला. त्यामुळे हृदयाच्या कार्याबद्दल क्षणाक्षणाची माहिती डॉक्टरांना मिळणे शक्य झाले आहे. डेक्कन परिसरातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे रुग्णाला फक्त वैद्यकीय अहवाल दाखविण्यासाठी वारंवार रुग्णालयात येण्याची गरज राहणार नाही, असा विश्वास हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केला.

हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ. अभिजित पळशीकर म्हणाले, ‘‘ही महिला रूग्ण पहिल्यांदा रुग्णालयात आली तेव्हा तिच्या हृदयाचे कार्य कमकुवत (२५ टक्के) होते. तिला थोडे अंतर देखील चालणे शक्य नव्हते. कारण, लगेचच दम लागायचा. हृदयाच्या कमकुवत झालेल्या स्नायूंमुळे ही स्थिती निर्माण झाली होती. हृदयाचे स्नायू कमकुवत का झाले. याबाबत मात्र कोणतेही लक्षणीय कारण समोर आले नाही. अशा परिस्थितीत हृदय प्रत्यारोपाच्या आधीचा पर्याय म्हणून पेसमेकरची निवड केली जाऊ शकते. यामध्ये अर्ध्या डॉलरच्या आकाराचे हे उपकरण कॉलरबोनच्या खाली (दोन दंडांना जोडणाऱ्या रेषेखालील बाजू) रोपित केले जाते.’’

या उपकरणाला हृदयाचे विविध कप्पे तीन वायर्सने जोडले जातात. या वायर्सना वैद्यकीय परिभाषेत ‘लीड’ असे म्हणतात. या वायर्समुळे हृदयाचे ठोके उपकरणाला कळतात आणि यामध्ये काही अनियमितता झाली, तर लहान प्रमाणात विद्युतप्रवाह निर्माण होतो. ‘कार्डियाक रि-सिंक्रोनायझेशन थेरपी’च्या माध्यमातून हृदयाचे विविध कप्पे एकसंध काम करावे यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले .

ते म्हणाले, “या उपकरणाला आता ब्ल्युटुथ वैशिष्ट्य असल्यामुळे याला थेट रुग्णाच्या मोबाईल फोनवरील कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारित ‘अॅप’शी जोडले जाऊ शकते. या अॅपमुळे हृदयाच्या ठोक्यांवर निरीक्षण केले जाऊ शकते आणि ब्ल्युटूथने जोडलेल्या या उपकरणामुळे हृदयाच्या ठोक्यांची लय आणि कार्यामध्ये कोणतेही बदल घडले तर डॉक्टरांना सतर्क केले जाऊ शकते. रुग्ण दूरवर असला तरीही डॉक्टर आपल्या रुग्णाच्या हृदयाच्या ठोक्यांवर निरीक्षण ठेऊ शकतात.”

तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात लक्षणीय बदल घडत असून कार्यक्षमता वाढत आहे. यामुळे आपण माहिती गोळा करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि संग्रहित करण्याच्या पद्धती बदलत आहेत. अशा रिअल टाइम मॉनिटरिंग तंत्रज्ञानामुळे रूग्ण आणि डॉक्टरांसाठी गोष्टी अधिक सोप्या होतील.

-अबरार अली दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, सह्याद्रि हॉस्पिटल

काय बदल झाला?
ब्ल्युटूथ कनेक्टिव्हिटी नसल्याने स्पेसमेकरवर अॅलनालायझर ठेऊन अहवाल काढला जायचा आणि तो डॉक्टरांना दाखविला जायचा. मात्र आता ‘रिअल टाइम कनेक्टिव्हिटी’मुळे प्रत्येक वेळेस रूग्णालयात यायची गरज नाही. अशी उपकरणे अजूनही महाग असली तरी इतर तंत्रज्ञानाप्रमाणेच कालांतराने ही स्वस्त होतील अशी आशा असल्याचे डॉ. पळशीकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com