
‘ममता बॅनर्जींनी विनाकारण काँग्रेसला दूषणे देऊ नये’
पुणे, ता. १५ ः लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत, या सत्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्यामुळे पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला तथ्यहीन दूषणे देऊ नयेत, तसेच युपीएमध्ये बिघाडी करू नये, असे आवाहन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
या लोकसभेच्या दोन्ही निवडणुका काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली झाल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. संविधानाची पायमल्ली होऊ नये, याकरिता राहुल संघर्ष करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून पुरोगामी महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी झाली आहे. प्रादेशिक घटक पक्षांच्या सुयोग्य समन्वयामुळेच काँग्रेसप्रणीत युपीएने १० वर्षे यशस्वी सरकार देशाला दिले. हे सत्य बॅनर्जींनी किमान मान्य केले पाहिजे,
असे तिवारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
-------------------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..